खिर्डी गावातील अंकुश तायडेची राज्य राखीव पोलीस दलात निवड


खिर्डी (10 फेब्रुवारी 2025) : गावातील अंकुश तायडे या तरुणाने मोठ्या जिद्द व परिश्रमातून पोलीस होण्याचे स्वप्न साकारले आहे.

अंकुश किशोर तायडे या तरुणाची आई प्रतिभा व वडील किशोर तायडे शेतमजुरी करतात. आपल्या तीन मुली व एक मुलाला शिक्षण देवून आभोडा, ता.रावेर येथील रहिवासी व खिर्डी येथे वास्तव्यास असलेले अंकुश किशोर तायडे याने जिद्द टिकाटीने आणि परिश्रमातून पोलीस होण्याचे स्वप्न साकार झाले. अंकुशच्या घराची परिस्थिती अत्यंत बिकट तसेच गरिबीची असून अंकुशने आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने तसेच आपली मेहनत व जिद्दीने भेटलेल्या संधीचं सोने करून दाखवले आहे. अंकुशची धुळे येथे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली. खिर्डी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन तसेच गावकर्‍यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते खिर्डी येथील अ.भा.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका ठमाबाई धुंदले यांचे नातू व शिक्षक प्रवीण धुंदले याचे भाचे आहेत.








खिर्डी बुद्रुक येथील बुद्धविहारात केला अभ्यास
खिर्डी बुद्रुक येथील बुद्धविहारात प्रत्येक समाजाचे तरुण अभ्यास करतात तसेच काही महिन्यांपूर्वीच याच बुद्धविहारात अभ्यास करून मलक समीर हा तरुण महाराष्ट्र पोलीस झाला. त्यानंतर अंकुश किशोर तायडे याला यश मिळाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !