भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात एक दिवसीय स्पेक्ट्रोस्कोपी सेमिनार
One-day spectroscopy seminar at Nahata College, Bhusawal भुसावळ (10 फेब्रुवारी 2025) : भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे वार्षिक एक दिवसीय सेमिनार ऑन स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्सचे आयोजन करण्यात आले होते
यांची व्यासपीठावर उपस्थिती
सेमिनारचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.डी.एन.पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.डी.येवले आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या युगात संशोधन गरजेचे
डॉ.मोहन फालक यांनी स्पेक्स्ट्रोस्कोपीमधील संशोधनाचे महत्व विषद केले. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्पेक्ट्रोस्कोपीचा योग्य वापर करून नाविन्यपूर्ण संशीधन किती गरजेचे आहे आणि येणार्या पिढीने स्पेक्ट्रोस्कोपी मधील नवनवीन संशीधनाला चालना देऊन आणि त्याचा वापर करून समाजात योगदान देण्याचा प्रयत्न कारावा, असे ते म्हणाले.
सेमिनारमध्ये डॉ.व्ही.एन.महिरे यांनी विद्यार्थ्यांना आय.आर.स्पेक्ट्रोस्कोपीवर मार्गदर्शन केले. डॉ.सी.एच.सरोदे यांनी एन.एम.आर.या स्पेक्ट्रोस्कोपीतील पद्धतीबद्दल माहिती दिली तसेच डॉ.ए.डी. क्षिरसागर यांनी मास स्पेक्ट्रोस्कोपी या विषयावर मार्गदर्शन केले.विविध महाविद्यालयातील एकूण 186 विद्यार्थ्यांनी या सेमिनार मध्ये सहभाग नोंदविला.
विभागप्रमुख डॉ.एस.डी.येवले यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रा.संगीता भिरूड यांनी मानले. यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ.उमेश फेगडे, डॉ.निलीमा पाटील, डॉ.सचिन कोलते, तेजस्विनी पिसाळकर, धनश्री बर्डे आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.प्रशांत पाटील कळवतात.
