भुसावळातील 32 वर्षीय महिलेवर जळगावात अत्याचार
32-year-old woman from Bhusawal raped in Jalgaon जळगाव (11 फेब्रुवारी 2025) : भुसावळातील एका भागातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय विवाहितेवर जळगावातील हॉटेल प्रगती पॅलेसमध्ये अत्याचार करण्यात आला. महिलेचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण ?
भुसावळ शहरातील एका भागातील 32 वर्षीय महिलेला जळगाव शहरातील हॉटेल प्रगती पॅलेस येथे नेत संशयित आरोपी विनोद रामचंद्र पाटील (जळगाव) याने केला. फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी व फिर्यादीच्या पतीकडून पैसे घेतले, त्यानंतर पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार 8 जुलै 2022 ते 12 जून 2023 दरम्यान घडला.








