शिवम नगरात धाडसी घरफोडी


जळगाव (11 फेब्रुवारी 2025) : मुख्य लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा तोडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दोन कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड असा सुमारे 34 हजारांचा मुद्देमाल घेत ते पसार झाले. शनिवार, 8 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार शिवम नगर परिसरात घडला. रविवार, 9 रोजी या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चोरट्यांची सुसाट एक्स्प्रेस
स्वप्नील विश्वनाथ गवळी (वय 32, रा. प्लॉट नं. 32, शिवम नगर) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. बंद घर दिसताच चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. घरातील दोन गोदरेज कपाटातील सामान बाहेर काढून मुद्देमालाचा शोध घेतला. 20 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र, 10 हजार रु. रोख, चार हजार किमतीचे दोन चांदीचे ब्रेसलेट, असा सुमारे 34 हजारांचा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले. हवालदार गुलाब माळी हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !