पाय घसरून विहिरीत पडल्याने साकळीतील 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू
यावल (12 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील साकळी येथील 45 प्रौढ इसम हा बकर्यांकरीता चारा घेण्यासाठी शिरसाड शेत शिवारात गेल्यानंतर शेत विहिरीत त्याचा पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोपाल पुनमचंद धोबी (45) असे मयताचे नाव आहे.
काय घडले नेमके
गोपाल धोबी हा इसम मंगळवारी आपल्या बकर्यांना चारा घेण्यासाठी गावाजवळील शेतात गेला असता शिरसाड शेत शिवारात असलेल्या सुधाकर राकृष्ण चित्रे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा पाय घसरुन तो विहिरीत कोसळला. ही घटना मंगळवारी घडली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी यावल पोलिसात धनंजय निंबाकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत गोपाल धोबी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस नाईक मोहसीन खान करीत आहे.








