रावेर तालुक्यात जीबीएस सदृश्य रूग्ण


रावेर (12 फेब्रुवारी 2025) : रावेर तालुक्यातील एका गावात एका 22 वर्षीय तरूण रूग्णाला जीबीएस सदृश्य लक्षणे आढळून आल्याने तालुक्यासह परिसरा तोमोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे. हा तरुण प्रयागराज येथील कुंभमेळ्याहून जाऊन आला असल्याची माहिती आहे. या तरूणाला बर्‍हाणपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचार न्युरोलिजिस्टकडे घेण्याचा सल्ला दिला आहे.

रावेर तालुक्यात खळबळ
रावेर तालुक्यातील हा तरुण युवक कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेला होता. मात्र कुंभमेळ्याहून परत आल्यावर त्याचीबिघडली. तब्बेत ठीक नसल्याने तरूणाने बर्‍हाणपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी जिबीएस सदृश्य लक्षणे असल्याचे सांगितले. व पुढील उपचार न्युरोलॉजिस्ट किंवा मुंबई येथे घेण्याचा सल्ला दिला. सदरची माहिती प्रशासनाला समजताच आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन जिल्हास्तरावरील प्रशासन व आरोग्य विभागाच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. आरोग्य विभागाचे एक पथक संबंधित गावाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !