विवाहितेशी सलगी वाढवत पुन्हा लग्नाच्या आमिषाने अत्याचार
अमळनेर (12 फेब्रुवारी 2025) : ओळखीचे प्रेमात झालेल्या रुपांतरानंतर विवाहितेवर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार 2022 नंतरच्या कालावधीत घडला. याप्रकरणी आरोपी एकनाथ छबीलाल पाटील याच्याविरुद्ध मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
2021 मध्ये विवाहित महिला व एकनाथ छबीलाल पाटील (पवार) (रा. सोनवद, ता.धरणगाव ) यांची ओळख झाली. यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. माझे लग्न झालेले असून मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे व तुझी मुलगी सांभाळायला तयार आहे, असे सांगून विवाहित महिलेला विश्वासात घेऊन विवाहित महिलेवर खापरखेडा येथे अत्याचार केला. तसेच आरोपी एकनाथ याने त्याच्या मूळगावी सोनवद येथे महिलेला घेऊन गेला. येथेही महिलेला लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर त्याने अत्याचार केला.



मारवड पोलिसात गुन्हा
एकनाथ याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवल्यामुळे विवाहित महिलेने 2022 मध्ये पती समाधान यांच्याकडून फारकत घेतली. त्यानंतर महिला व तिची मुलगी पुणे येथे एकनाथ सोबत पाच महिने एकत्र राहिले. ऑगस्ट 2025 पासून पुन्हा खापरखेडा येथे राहायला आल्यावर विवाहित महिलेला गरोदर असल्यामुळे तिने आरोपी एकनाथला लग्न करण्यास सांगितले मात्र आरोपी एकनाथ आजपर्यंत लग्न करण्यास टाळाटाळ करत आहे. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एकनाथ पाटील (पवार) याच्याविरुद्ध मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.





