भुसावळात विश्वकर्मा जन्मोत्सवानिमित्त गुणवंतांचा सत्कार
भुसावळ (13 फेब्रुवारी 2025) : शहरातील सुतार गल्लीत विश्वकर्मा मनुचारी विकास मंडळाच्या वतीने सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी सुतार-लोहार समाजाचे आराध्य दैवत श्री विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने महिलांना केंद्रबिंदू मानून महिलांसाठी होम मिनिस्टर, महिला सशक्तिकरण व्याख्यान, पालखी मिरवणूक व समाजातील इयत्ता दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले.
अॅड.मेघा वैष्णव यांनी ‘महिला सशक्तिकरण’ विषयावर व्याख्यान दिले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री आमदार संजय सावकारे यांची विशेष उपस्थिती होती . खंडवा येथील ग्रामीण आजीविका बाजारचे अध्यक्षा सुवर्णा कृष्णा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व सॉफ्टवेअर अभियंता हेमंत निंबाळे (अमेरिका), अधिवक्ता परिषद सचिव अॅड.देवेंद्र विसावे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीष सपकाळे, मनोज बियाणी, परीक्षीत बर्हाटे, पिंटू कोठारी, अॅड.बोधराज चौधरी, मुकेश पाटील, गुणवंत बोरोले, ललित मराठे आदींची उपस्थिती होती.

होम मिनिस्टरमध्ये शुभांगी मिस्तरी विजेत्या तर माधुरी सुर्यवंशी उपविजेत्या ठरल्या तसेच विजय सुर्यवंशी हे लकी ड्रॉचे विजेते ठरले. संस्थेच्या जयंती नियोजन समिती सदस्य, सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला व सल्लागार सदस्यांनी परिश्रम घेतले.
