नवीन शैक्षणिक धोरण व मूल्यांकन समजून घ्या : अशोक तायडे
भुसावळ (13 फेब्रुवारी 2025) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्वतःच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी सज्ज व्हा, आपल्या विद्यार्थ्यांमधील विविध क्षमता वाढीस लागण्यासाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन केंद्रप्रमुख अशोक तायडे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव व गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्स उपक्रम आणि सर्व शिक्षा अभियान यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रशिक्षणाचा पहिला टप्पा
पु.ग.बर्हाटे विद्यालयात 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण पहिला टप्पा आयोजित करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातून प्राथमिक 150 व माध्यमिक 150 असे एकूण 300 शिक्षक सहभागी झाले. माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण प.क. कोटीच्या विद्यालयात होत आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक गुणवंत पाटील व निलेश पाटील यांनी केले. तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण शिक्षण विस्तार अधकारी तुषार प्रधान व बी.डी.धाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी समन्वयक सचिन पाटील, सुनील वानखेडे, राहुल भारंबे, अल्पेश कुंभारे, जीवन महाजन, रवींद्र पढार आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात पाच दिवस या विषयावर मार्गदर्शन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, क्षमताधारीख मूल्यांकन, क्षमताधिष्टीत प्रश्न निर्मिती, नवी आव्हाने पेरणारे शिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, व्यावसायिक शिक्षण, समग्र प्रगती पत्रक व शिकण्याला प्राधान्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.






