अंजली दमानिया स्पष्टच म्हणाल्या : परळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिस्तीत निवडणूक घ्यावी


परळी (12 फेब्रुवारी 2025) : मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कैलास फड व त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिस्तीत निवडणूक घेण्याची मागणी करीत खळबळ उडवून दिली आहे. कैलास फडवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे आभारही मानले आहेत.

सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल
विधानसभा निवडणुकीत परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला होता. मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या अंगरक्षकाला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आले होते. कोण पालिीस? कशाचा बॉडीगार्ड? केंद्रात कुणीही जायचे नाही असे म्हणत देशमुख यांच्या अंगरक्षकाला बाहेर काढण्यात आले. एव्हढेच नाही तर शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी माधव जाधव यांना मारहाण झाली व यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


या घटनेला जवळपास अडीच महिने झालेत. त्यानंतर आता बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कैलास फड, त्याला मुलगा व इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीत पुन्हा शिस्तीत निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !