क्रिप्टो ट्रेडींग नफा मिळविण्याच्या आमिषाने पाचोर्‍यातील तरुणाला नऊ लाखांचा गंडा


जळगाव (12 फेब्रुवारी 2025) : क्रिप्टो ट्रेडींग करण्याचे टास्क देत नफा मिळवून देण्याच्या आमिषाने पाचोर्‍यातील तरुणाची नऊ लाख 12 हजार 114 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
प्रगत गोपाल गाडीलोहार (24, रा.पाचोरा) या तरुणाला सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन व्हॉटसअ‍ॅप व टेलीग्रामवरून संपर्क साधून त्यांना क्रिप्टो ट्रेंडींग करण्याचे टास्क देवून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. प्रगत यांनी सुरूवातीला गुंतविलेल्या चार हजार 30 रुपयांवर पाच हजार 839 रुपयांचा परतावा देण्यात आला. प्रगत यांनी विश्वास ठेवून वेळोवेळी एकूण नऊ लाख 12 हजार 114 रुपये गुंतविले. यात त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !