जैन व्हॅली एनर्जी पार्कच्या आवारातून पीव्ही सोलर केबलची चोरी
जळगाव (13 फेब्रुवारी 2025) : जळगाव शहरातील जैन व्हॅली एनर्जी पार्क येथून 35 हजार रुपये किंमतीची पीव्ही सोलार केबलची चोरी झाली. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
जळगाव ते शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील एनर्जी पार्क येथे ठेवण्यात आलेले जैन कंपनीचे मालकीची 35 हजार रुपये किंमतीचे पीव्ही सोलार केबल ठेवण्यात आली होती. 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीतमध्ये अज्ञात चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची पीव्ही सोलार केबल चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर येथील कर्मचारी अविनाश देविदास बढे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार समाधान टहाकळे करीत आहे.








