भाजपचे संघटन पर्व : बावनकुळे, चव्हाण 15 राोजी जळगाव दौर्यावर
जळगाव (13 फेब्रुवारी 2025) : भाजपाच्या ‘संघटन पर्व’ अभियानाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा प्रवासावर आहेत.
कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण या प्रवासात सोबत असणार असून जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी सह त्यांची कार्यशाळा या निमित्ताने घेण्यात येणार आहे.

शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष आमदार अमोल जावळे, जळगाव महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत ते कार्यशाळेत कार्यकर्ता व पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत.
कार्यशाळेस आजी-माजी आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका आजी माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मोर्चा-आघाडी प्रकोष्ट जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, मोर्चा आघाडी मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, सदस्य नोंदणी समिती सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार अमोल जावळे यांनी केले आहे.
