भुसावळात एक हजारांवर विद्यार्थ्यांनी केला सामूहिक सूर्यनमस्कार


भुसावळ (13 फेब्रुवारी 2025) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे रथ सप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त बुधवारी सकाळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शहरातील विविध शाळांमधील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग नोंदविला.

एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
जिल्हा क्रीडा भारती भुसावळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या सहकार्याने रथ सप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सकाळी शहरातील विविध विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग घेतला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते हनुमान व संत रोहिदास जयंती निमित्त संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शाहा, हिंदू सभा न्यास व संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सोनू मांडे, साईजीवनचे संचालक निर्मल कोठारी, अष्टभुजा रेस्टॉरंट व डेअरीचे संचालक नितीन धांडे, रोटेरियन सुरेश न्याती आदी उपस्थित होते.


मंत्रोच्चारात सामूहिक सूर्यनस्कार
महाराणा प्रताप विद्यालयाच्या पथकाने सूर्यनमस्कारचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी महाराणा प्रताप विद्यालय, ताप्ती पब्लिक स्कूल, के.नारखेडे विद्यालय, संत गाडगेबाबा हिंदी विद्यालय, आर.जे.झांबरे विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, श्री गाडगे बाबा विद्यालय, डी.एस.विद्यालय, म्युनिसीपल हायस्कूल, एस.आर.आंबेडकर विद्यालय, डी.एल हिंदी विद्यालय अशा विविध शाळेतील एक हजारापेक्षा विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारात सामूहिक सूर्यनस्कार घातले. सूत्रसंचलन राजेंद्र कुलकर्णी तर प्रास्ताविक डॉ.प्रदीप साखरे यांनी केले. यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, बी.डी.धाडी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले. सुमित साळुंखे, क्रीडा भारतीचे बी.एन.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे मुख्याध्यापक आर.आर.धनगर, माध्यमिक पतपेढीचे संचालक हेमंत चौधरी यांच्यासह शहरातील सर्व क्रीडा शिक्षक शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !