भुसावळ विभागातील ‘टॉप कॉप’ पुरस्काराने सन्मानीत

पोलीस उपअधीक्षकांची संकल्पना : पुरस्काराने कर्मचार्‍यांचा आत्मविश्वास दुणावला


भुसावळ (14 फेब्रुवारी 2025) : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या ‘पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ’ पुरस्काराने पाच कर्मचार्‍यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

या कर्मचार्‍यांचा झाला सन्मान
भुसावळ शहर ठाण्याच्या कॉन्स्टेबल ललिता रघुनाथ भारी यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये मिसिंग, प्रतिबंधक कारवाई, अकस्मात मृत्यू, गँग टोळीचे काम शंभर टक्के पूर्ण केले तर बाजारपेठचे हवालदार जावेद हकीम शहा यांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस आणले. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार आत्माराम मोरे यांनी गुन्ह्याची निर्गती व गंभीर गुन्हे उघडकीस आणले तर नशिराबाद पोलीस स्टेशनच्या महिला हवालदार सुनीता मधुकर होले यांनी बारनिशीचे कामकाम उल्लेखनीय केले तसेच तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबवली तर भुसावळ शहर वाहतूकचे सहाय्यक फौजदार संजय भदाणे यांनी मोटार व्हेईकल अ‍ॅक्टच्या केसेस मोठ्या प्रमाणावर केल्याने त्यांचा बक्षिसासह प्रमाणपत्राने गौरव करण्यात आला.

कायद्याच्या परीक्षेत ‘अव्वल’ कर्मचार्‍यांचा गौरव
कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महिला कर्मचारी रुपाली मधुकर कोलते, भूषण लिलाधर चौधरी, ईकबाल इब्राहिम सय्यद यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. दरम्यान पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील शालिनी दशरथ वलके व नंदकिशोर बाबुराव सोनवणे खातेनिहाय परीक्षेत उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरीक्षक झाल्याने तसेच अश्विनी गोरख जोगी यांनी सीसीटीएनएस प्रणालीत उत्तम काम केल्याने त्यांनाही गौरवण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहरचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, महेश गायकवाड, आसाराम मनोरे, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक उमेश महाले तसेच भुसावळ उपविभागातील सर्व दुय्यम अधिकारी तसेच 60 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !