रावेरात आमदार अमोल जावळे यांच्याहस्ते ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन
रावेर (14 फेब्रुवारी 2025) : शहरात शासकीय ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार अमोल जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. उटखेडा रोडवरील शासकीय गोदामात आमदार अमोल जावळे यांच्याहस्ते काटा पूजन करून शासकीय ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी डालू नथू टोके (चिनावल) या शेतकर्यांची ज्वारी प्रथम मोजण्यात आली. यावेळी आमदारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार बी.ए.कापसे, खरेदी- विक्री संघाचे चेअरमन निलेश चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संघाचे व्हा.चेअरमन बिसन सपकाळ, संचालक नीळकंठ चौधरी, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर धनगर, वाय.एस.महाजन, पुरुषोत्तम पाटील, रमेश पाटील, पंडित महाजन, बाजार समितीचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, जयेश कुयटे, विलास चौधरी, पीपल्स बँकेचे अध्यक्ष सोपान पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य योगेश पाटील, संघाचे व्यवस्थापक विनोद चौधरी, ग्रेडर प्रशांत पाटील, गोदाम व्यवस्थापक हरिदास मुळे यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

