उमर्टी सीमेवर आरोपींच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला


Policemen who went to arrest accused at Umarti border attacked चोपडा (16 फेब्रुवारी 2025) : मध्य प्रदेशात असलेल्या उमर्टी येथे एका जुन्या गुन्ह्यातील आरोपी पप्पीसिंग शिकलगरच्या मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकावर संशयीतांनी अनेर नदीवरील पुलावर हल्ला केल्याची संतापजनक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आरोपींच्या जमावाने कर्मचारी शशिकांत पारधी व किरण पारधी यांना धक्काबुक्की केली तसेच शशिकांत पारधी यांना रात्री नऊ वाजेपर्यंत पकडून ठेवले. या घटनेत सहाय्यक निरीक्षकासह दोघे जखमी झाले. याबाबतची माहिती कळताच जिल्हा पोलीस दलासह मध्यप्रदेशातील पोलिसांनी धाव घेत कर्मचार्‍यांची सुटका केली.

आरोपीला ताब्यात देण्यावरून वाद
चोपडा तालुक्यात अनेर नदीच्या पलीकडच्या काठावर असलेले पार उमर्टी हे गाव मध्य प्रदेशाच्या हद्दीत येते व अवैध शस्त्र बनवण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. आरोपी पप्पीसिंग शिकलगरला ताब्यात घेण्यासाठी चोपडा पोलीस ठाण्याचे एपीआय शेषराव नितनवारे, पोलीस शशिकांत पारधी, दीपक शिंदे, चेतन महाजन, विशाल पाटील, किरण पारधी हे सहा जण सायंकाळी शनिवारी सहा वाजता पार उमर्टी येथे जात होते. त्याच वेळी दोन्ही राज्यांची सीमा असलेल्या अनेर नदीच्या पुलावर पार उमर्टी गावातील लोक आणि पोलिसांमध्ये आरोपीच्या ताब्यावरून वाद झाले. अचानकपणे जमाव एकत्र येऊन त्यांनी पोलिसांना घेरले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !