प्रदूषण मोजणार्‍या यंत्रणेला विरोध : पिंप्रीसेकमच्या आंदोलकांविरोधात गुन्हा


भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातील सुदगाव रॉ वॉटर पंप हाऊसमध्ये प्रदूषण मोजणार्‍या यंत्रणेला विरोध करीत रस्ता अडवून ठेवणार्‍या आंदोलकांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
660 प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता संतोष प्रल्हाद वकारे (54, दीपनगर वसाहत) यांच्या फिर्यादीनुसार, पिंप्रीसेकम शिवारातील सुदगाव रॉ वॉटर पंप हाऊसमध्ये प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवण्यासाठी बुधवार, 12 रोजी सकाळी 11 वाजता जात असताना आंदोलकांनी रस्ता मंडप टाकून अडवला तसेच यंत्रणा बसवण्यासाठी फौंडेशनला विरोध दर्शवत वेळोवेळी बजावण्यात आलेल्या नोटीसींकडे दुर्लक्ष केले. याप्रकरणी रमाकांत प्रल्हाद चौधरी, रवींद्रसिंग कुलपदीपसिंग चहेल, गणेश सुकदेव तायडे, सुभाष रामकृष्ण पाटील, गणेश डोंगर तायडे, जालिंद पाटील, विशाल विजय पाटील व इतर अनोळखी (पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कखरे करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !