भुसावळात रेल्वे कर्मचार्याकडे घरफोडी : 25 हजारांचा ऐवज लंपास
भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : शहरातील एमओएच कॉलनीतील रेल्वे कर्मचार्याच्या बंद घरातून चोरट्यांनी सुमारे 25 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोर्या, घरफोड्या वाढल्याने नागरिक भयभीत
दीपक समाधान गवई (25, वसाडी, ता.नांदुरा, ह.मु.एमओएच कॉलनी, भुसावळ) हे रेल्वे कर्मचारी कुटूंबासह शहरात वास्तव्याला आहेत. 8 ते 9 दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करीत पाच हजार रुपये किंमतीचे पितळी पातेले, तीन हजार रुपये किंमतीचे पातेले, दोन हजार रुपये किंमतीचे पातेले व 15 हजारांची रोकड मिळून 25 हजारांचा मुद्देमाल लांबवला. गवई हे घरी आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.








