भुसावळात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात
भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : माता रमाई भीमबा आंबेडकर व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहरच्या वतीने अल्पोपहार फराळाचे वाटप डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सरचिटणीस संतोष ठोकळ, गणेश जाधव, रवींद्र दाभाडे, उपाध्यक्ष प्रेमचंद (अल्बर्ट) तायडे, गौरव वाघ, वाल्मीक पवार, दीपक गायकवाड, राकेश सपकाळे, दिनेश बालूरे, आकाश आव्हाड, विक्की गोहर, दीपक सोनवणे, रवींद्रनाथ खरात, संजय चव्हाण, नरेश खंडारे, रवींद्र घुले, शंकर कांबळे, श्याम गोरधे, चिटणीस भरत उमरिया, संजय नरवाडे, राज आठवले, प्रकाश लोडते, शुभम गोठवाल, विनोद लोडते यांनी परिश्रम घेतले. संजीवनी राहुल तायडे, राजेश्री सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव समिती, जय गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था व समस्त समाज बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
