भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात फूड डेकोरेशन स्पर्धा

भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच फूड डेकोरेशन स्पर्धा झाली. महाविद्यालयातील सांस्कृतिक समिती आणि वनस्पती शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. वनस्पती शास्त्र विभागाच्या नूतन अभ्यासक्रमात अन्नपदार्थांची निर्मिती आणि सुरक्षा हा भाग नव्याने अंतर्भूत झालेला असून त्या माध्यमातून विद्यार्थ्याना अन्नपदार्थांची निर्मिती आणि सुरक्षा तसेच आकर्षक मांडणी करता आली पाहिजे या उद्देशाने सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी पंधरा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मराठी ग्रामीण, शहरी तसेच गुजराथी मेनू तयार करून आणलेले होते. त्या मेनुंची आकर्षक मांडणी करून स्पर्धा झाली.
यांची होती उपस्थिती
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी स्पर्धकांनी मांडणी केलेल्या खाद्यपदार्थांचे अवलोकन केले. स्पर्धेसाठी प्रा.प्रवर्णा वानखेडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रथम पारितोषिक मीनल बोरनारे, द्वितीय पारितोषिक किर्ती नरेंद्र पटेल आणि तृतीय पारितोषिक स्वराज तायडे या विद्यार्थ्याना जाहीर करण्यात आले.
यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.श्रेया चौधरी, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.निर्मला वानखेडे यांनी परिश्रम घेतले. आयक्यूएसी चेअरमन प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.दयाघन राणे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे उपस्थित होत्या.
