छावा चित्रपट करमुक्त करा : शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्याचा आलेख असलेला ‘छावा’ हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासीक चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे.

पत्रान्वये केली मागणी
या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे आणि दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. करोडो रुपयांची कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लाभत आहे. स्वराज्यासाठी जीवाचं रान करणार्‍या संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांनी केलेला त्याग घरोघरी मनामनात पोहोचवावा इतिहास जिवंत राहावा यासाठी महाराष्ट्र शासनाने त्वरित हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !