राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुषखबर : फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार
मुंबई (17 फेब्रुवारी 2005) : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
आठवडाभरात खात्यावर येणार पैसे
लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केले आहे. कालच मी तीन हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पीक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडणार हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

