भुसावळात महिला क्रीडा मंडळातर्फे फळांसह भाज्यांची सॅलेड स्पर्धा
भुसावळ (17 फेब्रुवारी 2025) : शहरातील महिला क्रीडा मंडळातर्फे फळांसह भाज्यांची सॅलेड स्पर्धा जामनेर रोडवरील चौधरी हॉलमध्ये घेण्यात आली. भुसावळ परीसरातील महिलांनी उत्साहाने या स्पर्धेने सहभाग नोंदविला. पु.ओ.नाहाटा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रा.विद्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जंकफुडच्या काळात आपण रानभाज्या विसरलो असून त्याचे आहारात आरोग्यदायी महत्व असल्याचे प्रा.पाटील यांनी पटवून दिले.
नवनवीन पदार्थ बनवून कुटूंबाला आनंदी ठेवा : आरती चौधरी
प्रास्ताविकेत अध्यक्षा आरती चौधरी यांनी प्रत्येक महिलेत कलागुण असल्याचे सांगून स्वयंपाक ही महिलांची आवडीची, हक्काची जागा असल्याचे सांगितले. वेगवेगळे नवनवीन पदार्थ करून कुटुंबातील लोकांना आनंदी ठेवावे, असे प्रत्येक महिलेला वाटते पण आहारासोबत जीवनसत्वयुक्त भाजीपाला योग्य आकर्षक रीतीने मांडल्यास सर्व आनंदाने खातील, व कुटुंब निरोगी राहिल याची जबाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
परीक्षक म्हणून ज्योती राठोड होत्या. सूत्रसंचलन प्रकल्प प्रमुख विजया निकम यांनी केले. सचिव लता होसकोटे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. आभार जयश्री ओक यांनी मानले. पाहुण्यांची ओळख स्वाती नाईक यांनी करून दिली. महिला क्रीडा मंडळाच्या सदस्य दीपाली सराफ, मंगला पाटील, प्रमिला नेमाडे, अनिता कवडीवाले यांनी स्पर्धकांची व्यवस्था पाहिली. विनीता नेवे, प्राची राणे, प्रभा पाटील, राजेश्री कात्यायनी यांनी परिश्रम घेतले.
यांनी मिळवला स्पर्धेत विजय
प्रथम- सुषमा भारंबे, द्वितीय- अलका ढाके, तृतीय- मृणाल सोनार, उत्तेजनार्थ प्रथम- रेखाताई बटले, दुसरे- पल्लवी ढाके, तिसरे-लिपिक राऊत, टॅलेंटेड सहभाग- भावना पिंगळे, दर्शना पाटील, मनीषा सिंग, नंदा पांडव, प्रीती पिंगळे, सारिका भावसार, श्रद्धा महाले, सुनीता बेंडाळे, सुनीता सिंग, प्रतीक्षा नेवे






