अंजाळेत बस चालक-चारचाकी चालकाच्या वादाने वाहतूक कोंडी


यावल (18 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील अंजाळे बस स्थानकावर यावलकडून भुसावळ जाणार्‍या थांबलेल्या बस चालकाशी एका चारचाकी वाहन चालकाने वाद घातला व मला साईड का दिली नाही ? असे सांगत चालकास धक्काबुक्की करीत शिविगाळ केली. या वादामुळे अर्धातास वाहतूक कोंडी झाली.

अंजाळे, ता.यावल येथील बसस्थानकावर रविवारी सकाळी यावल-भुसावळ बस थांबली असताना बसच्या मागुन चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच. 13 सी. यु. 8606) घेवून अज्ञात चालक आला व त्याने थेट बस चालकाशी तू मला लवकर साईड का दिली नाही, तु मला धडक मारत होता, असे सांगत वाद घातला व थेट बसमध्ये जावुन चालकास धक्काबुक्की करीत शिविगाळ केली. सुमारे अर्धातास हा वाद चालला यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या व वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरीकांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला मात्र सायंकाळी अंजाळे येथील नागरीकांनी याबाबत यावल पोलिसांकडे तक्रार दिली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !