कोरपावली शेत शिवारात 58 वर्षीय इसमास सर्पदंश


यावल (18 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील कोरपावली येथील शेत-शिवारामध्ये 58 वर्षीय इसम रविवारी शेतात गहू पिकाला पाणी भरत असताना त्यांच्या डाव्या पायाला सर्पसद़ृश दंश झाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे.

कोरपावलीतील देवराम रामचंद्र येवले (58) हे रविवारी शेतात गहू पिकाला पाणी भरण्याचे काम करत असताना त्यांच्या डाव्या पायाला सर्पसदृश दंश झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना तेथून तातळीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉ.सहर हमदुल्ले, जॉन्सन चोरटे, प्रियतमा पाटील, कादर तडवी यांनी तातछडीने उपचार केले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात आले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !