विरावली येथून बसमध्ये चढताना शिक्षिकेच्या गळ्यातील पोत लांबवली


यावल (18 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील विरावली येथून 45 वर्षीय शिक्षिका एस.टी. बसद्वारे यावल शहरात येत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली. 64 हजार रुपये किंमतीची ही सोन्याची पोत होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सोमवारी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याचा कसून शोध
विरावली येथून योगेश्वरी नारायण धनगर (45) या शिक्षिका एस.टी.बसद्वारे यावलला येत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील 64 हजार रुपये किंमतीची सोन्याची फॅन्सी काळे मनीव्दारे गाठलेली मंगल पोत अज्ञात चोरट्याने चोरी केली. पोत चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबास सांगितला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात योगेश्वरी धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !