शहाद्यात मद्यधूंद फॉर्च्युनर चालकाने उडवल्याने माय-लेकांचा जागीच मृत्यू

Mother and daughter die on the spot after drunk driver rams Fortuner in Shahada शहादा (19 फेब्रुवारी 2025) : मद्यधूंद अवस्थेतील फॉर्च्युनर चालकाने धडक दिल्यान माय-लेकांचा मृत्यू झाला. हा अपघात शहादा येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला. या अपघातात कल्पना गजानन वाघ (45) व आकाश वाघ (19) यांचा मृत्यू झाला तर मृताचा भाचा भाविक वसईकर जखमी झाला. वाहनाच्या धडकेने यावेळी एका श्वानाचाही मृत्यू झाला. पसार आरोपी आदित्य पाटील हा जॉन डिअर ट्रॅक्टर शोरूमचे संचालक उचित पाटील यांचा मुलगा असून त्यास अटक करण्यात आला.
काय घडले शहाद्यात
कल्पना गजानन वाघ (45) व आकाश गजानन वाघ (19) हे डोंगरगाव रस्त्यावरून पायी घराकडे निघाले असताना भरधाव कार (एम.एच.15 जे.ए.5055) ने धडक दिली. या अपघातात माय-लेक जागीच ठार झाले. दरम्यान, अपघाताला कारणीभूत असलेला चालक हा अपघातावेळी दारू प्यायलेला असल्याने त्याच्याविरोधात हिट अँड रन व ड्रंक अँड ड्राइव्हचाही गुन्हा दाखल करण्यात आला.