आठ हजारांची लाच भोवली : शिक्षण विभागाचा सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Bribe of Rs 8,000 taken : Assistant Accounts Officer of Education Department in the net of ACB अहिल्यानगर (19 फेब्रुवारी 2025) : भविष्य निर्वाह निधीची फाईल मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच स्वीकारणार्या अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील सहाय्यक लेखाधिकारी, (वर्ग-2) अशोक मनोहर शिंदे (49, तुळसाई पार्कच्या पाठीमागे, गावडे मळा, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर) यास नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने लाचखोर पुरते हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
60 वर्षीय तक्रारदार हे शिक्षक आहेत. ते 3 जून 2022 रोजी शिक्षकी पैशातून सेवानिवृत्त झाले आहेत परंतु तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांना प्रोव्हिडंड फंड आज अखेर मिळालेला नाही. त्याकरीता तक्रारदार हे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयात काम करणारे शिंदे यांच्याकडे पाच वेळा जावून आल्यानंतर त्यांनी तुमचे काम खुप जुने असून ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून 20 हजार रुपये द्यावे लागतील. यात तडजोड होवून आठ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर मंगळवारी याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आला व आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन, जि.अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.








