महाकुंभाला जाणार्या 12 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल
भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना बदलाची नोंद घेण्याचे आवाहन
भुसावळ (19 फेब्रुवारी 2025) : रेल्वे प्रशासनाने महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भुसावळ विभागातून जाणार्या 12 गाड्यांच्या मार्गात परिवर्तन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या गाड्यांना छिवकी येथे थांबा
गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर पवन एक्सप्रेस 18 ते 28 दरम्यान तसेच गाडी क्रमांक 11062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस जयनगर येथून सुटणारी 18 ते 27 दरम्यान, गाडी क्रमांक 11033 पुणे-दरभंगा एक्सप्रेस पुणे येथून सुटणारी 19 ते 26 व गाडी क्रमांक 11034 दरभंगा-पुणे एक्सप्रेस दरभंगा येथून सुटणारी 21 ते 28 दरम्यान प्रयागराज छिवकी येथे तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.

या गाड्या कानपूर-लखनऊमार्गे धावणार
गाडी क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस- वाराणसी कामायनी एक्सप्रेस 18 ते 27 दरम्यान बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, जौनपूरमार्गे वाराणसी पोहोचणार आहे तर गाडी क्रमांक 11072 वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस 18 ते 27 दरम्यान नियोजित मार्गाऐवजी जौनपूर, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कँट एक्सप्रेस 18, 23 व 25 आपल्या नियोजित मार्गाऐवजी वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ मार्ग अयोध्या कँट पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 22130 अयोध्या कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 19, 24 व 26 रोजी गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेस 18 ते 27 दरम्यान आपल्या नियोजित मार्गाऐवजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, उन्नावमार्गे बनारस पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 12168 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 18 ते 27 फेब्रुवारीदरम्यान आपल्या नियोजित मार्गाऐवजी उन्नाव, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 22177 मुंबई -वाराणसी एक्सप्रेस 18 ते 27 दरम्यान नियोजित मार्गाऐवजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, उन्नाव मार्गे बनारस पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 22178 वाराणसी-मुंबई एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 18.02.2025 ते 27.02.2025 पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी उन्नाव, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसीमार्गे मुंबई पोहचेल. गाडी क्रमांक 22104 अयोध्या कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 18 व 25 रोजी गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल तर गाडी क्रमांक 22103 लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या कँट एक्सप्रेस 24 रोजी नियोजित मार्गाऐवजी बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊमार्गे अयोध्या कँट पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्सप्रेस 18 ते 27 दरम्यान नियोजित मार्गाऐवजी इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ़, जंघईमार्गे गोरखपूर पोहचेल. गाडी क्रमांक 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस 18 ते 28 दरम्यान नियोजित मार्गाऐवजी जंघई, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ़, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचाणर आहे. रेल्वे प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या नियोजनात वरील मार्ग बदलांची दखल घ्यावी व अधिक माहितीसाठी प्रवासी संबंधित रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






