रावेरात अल्पवयीन तरुणीचा विनयभंग : आरोपीला अटक


रावेर (19 फेब्रुवारी 2025) : शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करीत पीडीतेच्या आईसह बहिणीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी संशयीत रितेश सुधीर गवई (रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

गत एक वर्षापासून ते 15 फेब्रुवारी रात्री दहा दरम्यान संशयीताने पीडीतेचा विनयभंग केला व पीडीतेच्या आईसह बहिणीला या प्रकरणात पडल्यास ठार मारेल, अशी धमकी दिली. पीडीतेने रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !