रावेर शहरात प्रौढाची आत्महत्या
रावेर (19 फेब्रुवारी 2025) : शहरातील सौभाग्य नगरात 48 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनिल लालचंद चौधरी (48, सौभाग्य नगर, रावेर) असे मयताचे नाव आहे. अनिल चौधरी यांनी घरात कुणी नसताना गळफास घेतला. याप्रकरणी मयताच्या भावाने रावेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विष्णू भील करीत आहेत.








