जळगावात दुकानातून 15 हजारांची रोकड लांबवली
जळगाव (19 फेब्रुवारी 2025) : दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. कॅश काउटंरचे लॉक तोडुन ड्राव्हरमधील सुमारे 15 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. जुने बी.जे.मार्केटमधील दुकान क्रमांक 13 बेंअरिंग स्पेअर पार्ट येथे ही घटना रविवार,16 रोजी उघडकीस आली.
राजेंद्र गुलाबचंद जैन (वय 61,रा.जळगाव) हे व्यावसायिक असुन त्यांच्या मालकीचे बेअरिंग स्पेअर पार्ट दुकान आहे. व्यवसायातून आलेली रोकड त्यांनी कॅश काउंटरच्या ड्राव्हरमध्ये शनिवारी ठेवली होती. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी या दुकानाल लक्ष्य करत शटरचे लाकॅ तोडत दुकानात प्रवेश केला. त्यानंतर रोकड लंपास केली.








