पोलीस पथकाला पाळधीत धक्काबुक्की : पाच संशयीतांविरोधात गुन्हा


न्यूज नेटवर्क । धरणगाव (20 फेब्रुवारी 2025) : अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या धरणगावातील पोलीस पथकाला पाळधी गावात धक्काबुक्की करण्यात आली व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ाप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले पाळधीत ?
जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात एका गुन्ह्यातील संशयित आरोपी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी गेले असताा महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता पाचपांडे यांच्यासह पोलीस पथकाला संशयित भारती राहुल सोनवणे, प्रियंका किशोर सोनवणे, मीराबाई युवराज सोनवणे, राहुल युवराज सोनवणे आणि किशोर युवराज सोनवणे (सर्व रा. पाळधी, ता.धरणगाव) यांनी धक्काबुक्की केली आणि अरेरावीची भाषा वापरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.








या घटनेसंदर्भात महिला पोलीस कॉन्स्टेबल योगीता पाचपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी सायंकाळी 6 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर उंबरे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !