बनावट नोटांच्या बहाण्याने जबरी लूटीचा डाव उधळला : साक्री तालुक्यातील टोळीला नंदुरबार गुन्हे शाखेकडून बेड्या

एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त ः एक संशयीत पसार ः दोंडाईचातील जबरी चोरीची उकल


नंदुरबार (21 फेब्रुवारी 2025) : एक लाखांच्या बदल्यात सहा लाखांच्या नोटा देण्याच्या बहाण्याने लूट केली जाणार असल्याची माहिती नंदुरबार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. धुळे चौफुलीवरील दर्ग्यासमोर संशयीत आल्यानंतर पथकाने दोघांना पकडले तर एक संशयीत मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल आरेापींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर जबरी लुटीचा एक गुन्हा उघडकीस आणला असून बनावट नोटांचे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना एक लाखांच्या बदल्यात सहा लाखांच्या बनावट नोटा देण्याच्या बोलावल्यानंतर जबरी लूट होणार असल्याची माहिती मळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. पथक धुळे चौफुलीजवळील दर्ग्यावर आल्यानंतर ईनेश दिपू भोसले (24, जामदा, ता.साक्री, जि.धुळे), बाळूशेठ सजनसिंग भोसले (32, जामदा, ता.साक्री, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली तर बिनोर महारू पवार (जामदा, ता.साक्री, जि.धुळे) पसार होण्यात यशस्वी झाला. अटकेतील आरोपींच्या ताब्यातून तीन बनावट नोटांचे बंडल, 15 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल, एक चैन व दोन वाहने मिळून एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.




जबरीने रक्कम हिसकावण्याचा प्लॅन उधळला
आरोपींच्या चौकशीत त्यांनी दोंडाईचा येथे एकास अडवत त्याच्याकडील रक्कम, चैन व मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली तसेच आतादेखील एक लाखांच्या बदल्यात सहा लाखांच्या नोटा देण्याचे खोटे आमिष दाखवून संबंधिताला लूटण्याची तयारी असल्याचे व या प्रकरणात प्लॅन आचार चव्हाण (जामदा, ता.साक्री, जि.धुळे) याचा असल्याचा आरोपींनी सांगितले. आरोपींविरोधात नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार राकेश मोरे, विशाल नागरे, दादाभाई मासुळ, नाईक अविनाश चव्हाण, शिपाई राजेंद्र काटके, आनंदा मराठे आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !