अंबडमधील दरोड्याची उकल : एका आरोपीला बेड्या
अंबड (21 फेब्रुवारी 2025) : अंबड येथील श्री ज्वेलर्समध्ये सोमवारी भर दिवसा दरोडा टाकण्यात आला होता. याप्रकरणात गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने नीलेश उर्फ शुभम बेलदार (25, रा.दत्तनगर, चुंचाळे) यास अटक केली असून अन्य दोन संशयीतांचा कसून शोध सुरू आहे. आरोपीच्या ताब्यातून साडे चार तोळे सोने व साडे सहा तोळे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
काय घडले नेमके
अंबड पोली ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागातील एका सराफी दुकानात दोघे दरोडेखोर तोंडाला रूमाल बांधून शिरले. त्यांनी गावठी पिस्तूलचा धाक दाखवून दागिने लुटून पळ काढला होता. पथकाने सिन्नरफाटा येथे सापळा रचून बेलदार हा गुन्ह्यातील बुलेट दुचाकीने आल्यानंतर त्यास अटक केली.








