रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : भुसावळ विभागातून धावणार्या 12 रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द
प्रवाशांची गैरसोय : सात गाड्यांचे मार्ग बदलले : परिचालनामुळे निर्णय
12 trains running through Bhusawal division cancelled at the last minute भुसावळ (22 फेब्रुवारी 2025) : मुंबई येथून सुटणार्या मात्र भुसावळ विभागातून धावणार्या 12 रेल्वे गाड्या परिचालनाच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्या आहेत तर सात गाड्यांच्या मार्ग परिवर्तनाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने आधीच बुकींग करून प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, कुंभ मेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अतिरीक्त गाड्या चालवण्यात येत असताना दुसरीकडे ऐन वेळी नियमित धावणार्या गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
या रेल्वेगाड्या रद्द
गाडी क्रमांक 01027 दादर-गोरखपूर विशेष गाडी 22 व 23 तसेच 25 प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे तर गाडी क्रमांक 01028 गोरखपूर-दादर विशेष गाडी 24 व 25 तसेच 27 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा एक्सप्रेस 22 व 25 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द तर गाडी क्रमांक 11060 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 24 व 27 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 19045 सुरत-छपरा एक्सप्रेस 23 व 24 तसेच 26 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली तसेच गाडी क्रमांक 19046 छपरा-सुरत एक्सप्रेस 25 व 26 तसेच 28 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस 25 व 26 तसेच 27 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली तसेच गाडी क्रमांक 01025 दादर-बलिया विशेष गाडी 26 व 28 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली असून गाडी क्रमांक 20961 उधना-बनारस एक्सप्रेस 25 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली तसेच गाडी क्रमांक 20962 बनारस-उधना एक्सप्रेस 26 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11081 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस 26 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11082 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 28 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे.

सात गाड्यांचे बदलले मार्ग
गाडी क्रमांक 20933 उधना-दानापूर एक्सप्रेस 25 फेब्रुवारी रोजी इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसीमार्गे दानापूर येथे पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस 25 व 26 रोजी इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसीमार्गे जयनगर येथे पोहोचेल तर गाडी क्रमांक 11033 पुणे-दरभंगा एक्सप्रेस 26 रोजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसी मार्गे दरभंगा येथे पोहोचेणार आहे व गाडी क्रमांक 11062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 25 व 26 रोजी वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 22132 बनारस-पुणे एक्सप्रेस 26 रोजी बनारस, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसीमार्गे पुणे येथे पोहोचेल तर गाडी क्रमांक 20934 दानापूर-उधना एक्सप्रेस 26 रोजी वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे उधना येथे पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 18609 रांची-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 26 रोजी वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी व गैरसोय टाळण्यासाठी 139 वर गाडीची अद्ययावत स्थिती जाणून घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






