अल्पवयीनाने विवाहानंतरच्या अत्याचारातून दिला कन्येला जन्म : अमळनेर पोलिसात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा


अमळनेर (24 फेब्रुवारी 2025) :  पीडीता अल्पवयीन अतसानाही तिचा विवाह लावण्यात आला व अत्याचारानंतर पीडीता गर्भवती राहून तिने मुलीला जन्म दिला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात पतीसह सासू आणि सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण
नंदुरबार जिल्ह्यातील एका गावातील 17 वर्षीय मुलीचे1 एप्रिल 2024 रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकू तांडा येथील 27 वर्षीय तरुणाशी लग्न झाले. पीडित मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून तिने एका मुलीला जन्म दिला. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.




पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, रविवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता अमळनेर पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह सासू-सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बारेकर करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !