स्वारगेट स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा नराधम सराईत गुन्हेगार : आरोपीची माहिती देणार्‍यास एक लाखांचे बक्षीस


A criminal who raped a young woman at Swargate station is a serial killer : A reward of one lakh rupees will be given to the accused पुणे (27 फेबु्रवारी 2025) : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार मंगळवारी समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तरुणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तरुणीवर तब्बल दोन वेळा अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान . हा गुन्हा आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 36, रा. शिक्रापूर) याने केल्याची माहिती समोर आल्यानंतर आरोपीची माहिती देणार्‍यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत.

आठ पथकांद्वारे आरोपीचा शोध
पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणार्‍यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




काय घडले नेमके
पीडिता मंगळवारी पहाटे ाडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आली. ती फलटणला निघाली होती. ती बसची वाट पाहात थांबली असताना गाडेने तिला फलटणची बस , पलीकडे लागत असल्याचे सांगत शिवशाही बसमध्ये नेले व तिचा गळा आवळत ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. या घटनेने तरुणीला मोठा धक्का बसला होता. तिने खाली आल्यावर एक प्रवाशाला गाडेने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तरुणी काही वेळाने आलेल्या फलटणच्या बसमध्ये बसून निघून गेली.

दरम्यान, प्रवासात अस्वस्थ वाटत असतानाच तिने मित्राला फोन करून घटना सांगितली. मित्राने धीर दिल्यावर ती सातारा येथून पुन्हा माघारी फिरून स्वारगेटला आली. तेथे येऊन सकाळी नऊच्या सुमारास तिने स्वारगेट पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सध्या पीडित तरुणी ससून रुग्णालयात अ‍ॅडमिट असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

उद्धव सेनेकडून स्वारगेट बसस्थानकावर तोडफोड
स्वारगेट बसस्थानकावर मंगळवारी पहाटे झालेल्या बलात्कार प्रकरणावरून स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत राजकीय पक्ष आक्रमक झाले. उद्धवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बसस्थानकात जाऊन तोडफोड केली. प्रशासन तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. वसंत मोरे यांच्यासह उद्धवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कॅबीन, बसची तोडफोड केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !