सहा हजारांची लाच भोवली : पारोळा तलुक्यातील शेवगे तलाठी एसीबीच्या जाळ्यात
जळगाव (27 फेब्रुवारी 2025) : एन.ए.झालेल्या प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना पारोळा तलुक्यातील शेवगे बुद्रुक तलाठ्याला जळगाव एसीबीने गुरुवार, 278 फेब्रुवारी रोजी अटक केली. महेशकुमार भाईदास सोनवणे (50) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
42 वर्षीय तक्रारदार व त्यांचे भाऊ यांच्या शेवगे बुद्रुक, ता.पारोळा येथील एनए झालेल्या शेतातील 9 प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात तलाठी सोनवणे यांनी तक्रारदाराकडे प्रत्येक नोंद घेण्यासाठी एक हजार 130 प्रमाणे एकूण 9 नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात 10 हजार 170 रुपयाची लाच मागितली व सहा हजार रुपये लाच देण्याचे गुरुवार, 27 रोजी ठरले. तक्रारदाराने एसीबीडे तक्रार देताच सापळा रचण्यात आला व पंचांसमक्ष लाच स्वीकारताच तलाठ्याला अटक करण्यात आली.



यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हवालदार किशोर महाजन, कॉन्स्टेबल राकेश दुसाणे, प्रदीप पोळ यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.