भुसावळात नुपूर महोत्सवात उधळले कथक आणि कथकली नृत्याचे रंग

भुसावळ शहरता नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीचा उपक्रम


भुसावळ (28 फेब्रुवारी 2025) : शहरातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीतर्फे महाशिवरात्रीनिमित्त ‘नुपूर महोत्सव 2025’ या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले. शहरातील डॉ.बी.व्ही.खाचणे हॉलमध्ये सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात डॉ.व्ही.बी.खाचणे, महेंद्र मांडे, रमाकांत भालेराव, चारू भालेराव या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकात नुपूरचे संचालक रमाकांत भालेराव यांनी नुपूरच्या कार्यक्रमाची माहिती दिली. स्थानिक युवा चित्रकार चंद्रवीर बेहेरा, वेशभूषा करणार्‍या मालती श्रीखंडे, तबला साथ करणारे शिरीष जोशी, संवादिनीवर साथ करणार्‍या स्मिता कुलकर्णी, सूत्रसंचालन करणारे गिरीश कुलकर्णी यांचा मान्यवरांचे हस्ते तसेच सर्व सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. त्रितालमध्ये उठान, आमद, तोडे, चक्करदार तोडे, परन, फर्माईशी परन, गत, जिनती की तिहाई (यात नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांचा मोबाईल क्रमांकाची त्रितालमध्ये तिहाई गुंफण केली ) कवित्त, बाट, साक्षी कुलकर्णी, डिंपल गाढे, हेमांगी पंडागरे यांनी सादर केले. त्यांना तबला साथ शिरीष जोशी, संवादिनी साथ स्मिता कुलकर्णी यांनी केली. पंढत चारू भालेराव यांनी केले. नंतर गणपती स्तोत्र (प्रणम्य शिरसा देव) दिशिता अग्रवाल, भक्ती उके, इलिशा झासकर, वीरा सोनवणे, हेतल फेगडे यांनी सादर केले. नंतर शंकर भंडार बोले (राग – शंकरा, ताल – एकताल) देवकी नाईक, अंजली महेंद्रे, एकता वाणी, किमया भंडारी यांनी सादर केले. नंतर आदिदेव महादेव हे राग- यमनमधील गीतावर धनश्री भुरे, मानसी टेकवाणी, प्रियांशी जुनागडे, मोक्षदा तळेले, नुपूर भालेराव यांनी नृत्य सादर केले. नंतर तराना, राग- जय जयवंती, ताल- एकताल
प्राण्वी उपाध्याय, सान्वी कुंभलकर, अश्विनी सपकाळ यांनी सादर केले. शंकर महादेव या गीतावर प्रीती पाटील आणि मंजु शर्मा यांनी नृत्य सादर केले. नटराज स्तुतीवर यशस्वी पाटील, अंशू वडनेरे, मधुश्री गायकवाड यांनी सादरीकरण केले. कथक, तीन ताल डिंपल गाढे, नुपूर भालेराव, लतिका श्रीखंडे यांनी सादर केले.


कथकली नृत्याला दाद
कोलकाता येथील पाहुणे कलाकार हरी कमल मुजुमदार यांनी कथकली नृत्य प्रकार सादर करून वातावरण प्रफुल्लित केले. वंदन हो..हे संगीत चित्रपट यातील पद यावर प्राण्वी उपाध्याय, अदित्री दत्ता, आस्था पाटील, सान्वी कुंभलकर, अश्वती सपकाळ, स्वरा हेडा यांनी सादर केले. नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी नागेंद्र हाराय या शिव वंदनावर नृत्य सादर केले. नंतर शंभो शंकरा ही शिव स्तुति सायली नाईक, रुपाली वाणी, गीता नारखेडे, जास्वंदी जावळे यांनी सादर केले. तराना-राग यमन हिमांशु जावळे याने सादर केला.
नुपूर भालेराव हिने कथक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.शंकर अती प्रचंड या शिव धृपद या प्रकारावर साक्षी कुलकर्णी, डिंपल गाढे यांनी अप्रतिम नृत्य सादर केले.

हरी मुजुमदार यांचा सन्मान
पाहुणे कलाकार हरी मुजुमदार यांनी राष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय नृत्याचा प्रचार आणि प्रसाराचे उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल त्यांचा नृत्यश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराच्या स्वरूपात शाल, श्रीफळ आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गंगा स्तुति विस्तीर्ण प्रतुरे… ओ गंगा बहेती है क्यू? हे भूपेन हजारिका यांच्या मूळ गाण्याने भाषांतरित संस्कृत गीत यावर नम्रता सराफ, मुग्धा काळवीट आणि नुपूर अँकॅडमी चे सर्व कलाकारानी
सामुदायिक सादरीकरण केले. सूत्रसंचालन व आभार गिरीश कुलकर्णी यांनी मानले. प्रकाश फेगडे, शीतल फेगडे, वरद फेगडे, भावेश फेगडे, हर्षला साळी, गजानन कुलकर्णी, हरीश कोल्हे, ऋतिक सोनार, शशिकांत गोरवाडकर यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !