हतनूर धरणातून यंदा रब्बीच्या हंगामासाठी चौथे आवर्तन सुटले

रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील 37 हजार हेक्टरला लाभ


भुसावळ (28 फेब्रुवारी 2025) : हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी चौथे आवर्तन देण्यात आले. 28 फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन दिले जाणार आहे. यामुळे रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील शेतकर्‍यांना फायदा होईल. तब्बल 37 हजार हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी यामुळे लाभ होईल. फेब्रुवारी अखेरनंतर धरणाचा उन्हाळी हंगाम सुरू होणार आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने चौथे आवर्तन दिले आहे.

शेतकर्‍यांना मोठा दिलासा
हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक महिन्याला दुसर्‍या पंधरवड्यात किंवा आवश्यकतेनुसार चार आवर्तन दिले जातात. धरणात यंदा गतवर्षाच्या तुलनेत अधिक जलसाठा आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून रब्बी पिकासाठी चार आवर्तन दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार पाटबंधारे विभाग हतनूर धरणाने 21 फेब्रुवारीपासून चौथे आवर्तन दिले. पहिल्या दिवशी 200 क्युसेस वेगाने तर यानंतर दररोज 475 क्युसेस प्रती दिनानुसार आवर्तन देण्यात आले आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन सुरु राहिल. यामुळे लाभक्षेत्रात येणार्‍या रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील तब्बल 37 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

बिगर सिंचनसाठीही आवर्तन मिळेल
हतनूर धरणातील जलसाठ्याचे योग्य नियोजन केले आहे. यामुळे सिंचनासाठी चौथै आवर्तन देता आले. बिगर सिंचन पाणी वापर संस्थांनाही आगामी काळात आवश्यकतेनुसार आवर्तन दिले जाईल, असे हतनूरचे शाखा अभियंता एस.जी.चौधरी म्हणाले.


कॉपी करू नका.
WhatsApp Group