चाळीसगाव तालुक्यात अपघातात दापूरेतील दुचाकीस्वार ठार


चाळीसगाव (28 फेब्रुवारी 2025) : भरधाव आयशरच्या धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात मालेगाव ते चाळीसगाव रोडवरील साकुर फाट्याजवळ घडला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू दादाजी सुर्यवंशी (26 रा.दापुरे, ता.मालेगाव, जि.नाशिक) असे मयताचे नाव आहे.

काय घडले नेमके
नंदू सुर्यवंशी हा तरुण 23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मालेगाव ते चाळीसगाव रस्त्याने दुचाकीने जात असतांना रस्त्यावरील साकुर फाटा ते पिलखोड गावादरम्यानच्या राजनंदिनी हॉटेलच्या रोडवर आयशर गाडी क्रमांक (एम.एच.20 डी.टी.4702) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नंदू सुर्यवंशी हा जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर चालक आयशर वाहन घेवून पसार झाला. या घटनेबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार अशोक राठोड करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !