मोठे वाघोद्यात गो रक्षकांवर दगडफेक व मारहाण


  1. सावदा (1 मार्च 2025) :  अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणार्‍या वाहनाला अडवण्यासाठी गेल्यानंतर गो रक्षकांवर काहींनी दगडफेक करीत मारहाण केली. ही धक्कादायक घटना मोघे वाघोदा येथे गुरुवार, 28 रोजी घडली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या गोरक्षकांनी तसेच वाघोदासह सावदा, चिनावल येथील ग्रामस्थांनी धाव घेत गोरक्षकांवर हल्ला करणार्‍यांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सुमारे दोन तास बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाघोदा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली तर यावेळी झालेल्या बाचाबाचीत वाघोदा येथील पोलीस पाटील यांना सुद्धा मारहाण करण्यात आली.

गोरक्षकांवरच झाला हल्ला
वाघोदासह निंभोरा, चिनावल व सावदा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे अवैधरित्या गोवंश वाहतूक सुरू असून त्यांची कत्तल केली जात आहे. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी परिसरातील गोरक्षकांनी गोवंश वाहतूक व परिसरातील कत्तलखाने बंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तयतच गुरुवारी अवैधरित्या गोवंश वाहतुकीचे वाहन गोरक्षकांना कळताच त्यांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी गोरक्षकांवरच हल्ला करण्यात आल्याने वाघोदा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

संत-महंतांची धाव
यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पवन दासजी महाराज, ह.भ.प.धनराज महाराज, अंजाळेकर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री योगेश भंगाळे, पंकज नारखेडे, राहुल पाटील, संजय माळी, मनीष भंगाळे, योगेश बोरोले, सुरेंद्र न्हावी, स्वप्नील पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन गोरक्षकांवर हल्ला करणार्‍यांवर तत्काळ अटक करण्याची मागणी केली तसेच परिसरातील अवैध गोवंश वाहतूक बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. हा प्रकार एक महिन्याच्या आत बंद न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले जाईल, असे इशारा जनार्दन हरी महाराज यांनी दिला.




लोकप्रतिनिधींची भेट
सावदा पोलीस ठाण्यात ामदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, सावदा सहा.निरीक्षक विशाल पाटील, निंभोरा सहा.निरीक्षक हरीदास बोचरे व कर्मचार्‍यांनी धाव घेतली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !