एरंडोल शहरात रिल स्टार तरुणाची हत्या : अटकेतील तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी


Reel star youth murdered in Erandol city एरंडोल (1 मार्च 2025) :  रील स्टार असलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एरंडोल पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. संशयीताना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तीना दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, रील स्टार तरुणाच्या फालोअर्सला खून प्रकरणानंतर मोठा धक्का बसला आहे.

रील स्टारच्या हत्येने एरंडोल तालुक्यात खळबळ
रील स्टार असलेल्या विकी उर्फ हितेश हा माजी सैनिक असलेल्या वडील विठ्ठल पाटील यांच्यापासून विभक्त राहत असतानाही माजी सैनिक असलेल्या वडिलांचा छळ करून मारहाण करीत होता. या प्रकाराला कंटाळून मंगळवार, 25 रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विठ्ठल पाटील (वृंदावन नगर, एरंडोल) यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली होती. त्यात मुलगा हितेश हा दारू पिवून सातत्याने मारहाण करीत होता व त्यास कंटाळून आपण त्याचा भवरखेडा येथील गोविंदाबाबा धरणाजवळ मृतदेह पुरल्याचा उल्लेख होता.




कुठवर अन्याय सहन करायचा म्हणत त्यांनी खुनाची घटना का घडली ? याचा उल्लेखही चिठ्ठीत केल्यानंतर खुनाची घटना समोर आली. बुधवारी विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येचा उलखडा झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला दिशा दिली व गुरुवारी मयत तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले.

पोलिसांच्या तपासात अन्य आरोपी निष्पन्न
मयत विठ्ठल पाटील यांनी मुलाच्या खुनाची कबुली देत आत्महत्या केली असलीतरी केवळ एकट्याकडून खून करून मृतदेह पुरण्याची बाब अशक्य असल्याने एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तपासाला गती दिली व या खुनात मयत तरुणाचा काका, चुलत भाऊ व जेसीबी चालकही सहभागी असल्याची बाब निष्पन्न होताच त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्यानंतर खुनाचा नेमका प्रकार समोर आला. मृत तरुणाचा मृतदेह दफन करण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबीदेखील पोलिसांनी जप्त केला आहे.

चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
मयत रील स्टार हितेशची पत्नी शीतल हितेश पाटील (20) हिने एरंडोल पोलिसात पतीच्या खून प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून मयत विठ्ठल पाटील, मयत पतीचा काका नामदेव सखाराम पाटील (55, भंवरखेडा, ता.धरणगाव) काकांचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील (28, रा.भवरखेडा) व जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील (24, भवरखेडा) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर उर्वरीत तीन आरोपींना पोलिसांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व सहकारी करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक शंकर पवार, सहाय्यक निरीक्षक रोहिदास गबाले, हवालदार अनिल पाटील, कपिल पाटील, संदीप पाटील, योगेश पाटील, मिलिंद कुमावत, आकाश शिंपी, प्रशांत पाटील आदींच्या पथकाने केली.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !