शिरसोली ग्रामपंचायत परिसरात सुरा बाळगून दहशत


जळगाव (1 मार्च 2025) : धारदार सुरा हातात घेत शिरसोली ग्रामपंचायत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्र गतीमान केले आहे. मंगळवार, 25 रोजी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास सुकदेव सुनील भिल (20, रा. शिरसोली प्र.न.) हा तरुण धारदार सुरा घेवून वावरत होता.

ही गोपनीय माहिती मिळताच या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शिरसोली येथे जावून प्रकाराची माहिती घेतली. हवालदार समाधान पाटील हे तपास करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !