सावित्रीनगरात अर्ध्या धाडसी घरफोडी करीत दोन लाखांचा मुद्देमाल लांबवला


जळगाव (1 मार्च 2025) : घराच्या दरवाजाचे आणि लोखंडी गेटचे कुलूप तोडत चोरटे घरात शिरले. लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून सोन्याचे दागिने, रोकड मिळून दोन लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी अवघ्या 22 मिनिटात डल्ला मारत पळ काढला. ही घरफोडी मंगळवार, 25 रोजी पहाटे 3.08 ते 3.30 वाजेच्या सुमारास शहरातील सावित्रीनगरात घडली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह गुन्हे पथकाने जावून प्रकार जाणून घेतला.


सुरेश हिराराम सोलंकी (41, रा.एस.टी. वर्कशॉप सावित्रीनगर, प्लॉट नं. 07) हे वास्तव्यास आहेत. ते सुवर्ण कारागीर आहेत. पहाटेच्या सुमारास चोरटे दुचाकीने सावित्रीनगरात आले. सोलंकी यांच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडुन त्यांनी घरात प्रवेश केला.

किचन रुममध्ये ठेवलेले लोखंडी कपाटाचे लॉकर उघडले. सोने चांदीचे दागिने रोकड हाती लागताच चोरटे अवघ्या 22 मिनिटात येथून पसार झाले. या प्रकरणी बुधवार,26 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक राहुल तायडे हे तपास करीत आहेत.

ओळख न पटण्यासाठी तोंडाला बांधला रुमाल
दुचाकीने आलेल्या दोन चोरट्यांनी रुमालाने चेहरा बांधलेला होता. दुचाकी बाहेर लावली. त्यानंतर लोखंडी गेटचे कुलुप तोडले. पुढे दरवाजाचे कुलूप तोडले. मुद्देमालाचा शोधाला सुरुवात केली. लोखंडी कपाटाचे लॉकर उघडले. मुद्देमाल घेऊन तत्काळ घराबाहेर पडले. सुसाट दुचाकीने पसार झाले.

असा नेला मुद्देमाल
80 हजार रुपये किमतीचे एक किलो चांदीचे 20 जोड पैजन वजन अंदाजे 50 ग्रॅम, 30 हजार किमतीचे चांदीचे 20 सिक्के त्यावर लक्ष्मी व गणपतीचे चित्र अंदाजे वजन 10,20,50 ग्रॅम ,30 हजार रुपये सोन्याचे दोन सिक्के अंदाजे दोन ग्रॅम वजन. 40 हजार रुपयांची रोकड, 20 हजार किमतीचे सोन्याचे कानातील रिंगचे दोन जोड अंदाजे दोन ग्रॅम वजन असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !