भुसावळ शहरात 3 मार्चपासून मोफत योग शिबिर


भुसावळ (1 मार्च 2025) : मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम योग व निसर्गोपचार विभागातर्फे अद्वैतानंद योग अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओ, रामानंद हॉल समोर, भुसावळ 3 ते 9 मार्च दरम्यान सायंकाळी 5 ते 6 या वेळेत निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त खास मुली आणि महिलांसाठी हे शिबिर होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होते त्यामुळे स्वतः साठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे यासाठी दररोज किमान एक तास तरी स्वतःसाठी प्रत्येकाने काढायला हवा या उद्देशानेच हे निःशुल्क योग शिबिर घेण्यात येत आहे.

या शिबिरासाठी एम.जे.कॉलेजचे सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अ‍ॅण्ड नॅचरोपॅथी येथील योग विभागप्रमुख डॉ.देवानंद सोनार आणि प्रा.ज्योती वाघ यांच्या मार्गदर्शनासखाली या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी योगप्रशिक्षक योजना पाटील या योग शिबिरात मार्गदर्शन करतील. शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !