चाळीसगाव-पाचोरा तिसर्या रेल्वे लाईनवर 4 व 5 रोजी स्पीड चाचणी
भुसावळ (1 मार्च 2025) : चाळीसगाव-पाचोरादरम्यान तिसर्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे लाईन विभागाच्या संरक्षात्मक तपासणीसाठी मुख्य संरक्षा आयुक्त (कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी), सेंट्रल सर्कल यांचे निरीक्षण 4 व 5 मार्च रोजी होणार आहे.
या तपासणी अंतर्गत इंजिन स्पीड चाचणी होणार असल्याने रेल्वे मार्गावर स्थानिक रहिवाशांनी आपल्या पाळीव प्राण्यांना आणू नये तसेच रेल्वे मार्ग ओलांडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे मार्गावर कोणतेही अडथळे (वस्तू, गाडी, मलबा निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी व रेल्वे प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.







