मोठे वाघोदा येथे गोरक्षकांसह पोलीस पाटलावर हल्ला : सहा संशयीतांना अटक


मोठे वाघोदा (2 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे 28 रोजी बुर्‍हानपू-अंकलेश्वर महामार्गावरून अवैधरित्या गोवंशची वाहतूक होत असताना गोरक्षकांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हल्लेखोरांनी गोरक्षकांसह पोलीस पाटील यांना मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सहा संशयीतांना अटक करण्यात आली.

वाघोदा येथील 40 ते 50 जणांच्या हल्लेखोरांनी येथील पोलीस पाटील परशुराम भोसले व गौरक्षक कुलदीप पवार, केतन पाटील, निखिल महाजन, कुणाल नारखेडे, यांना बेदम मारहाण केली व यातील गौरक्षक कुलदीप पवार यांच्या कडील महागडा मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली होती. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकात पाटील यांनी भेट शांतता राखण्याचे आवाहन केले होते. या घटनेतील 10 आरोपी इतर 5 ते 10 संशयित आरोपी यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे व उर्वरीत आरोपी पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध सुरू आहे.


या संशयीतांविरोधात गुन्हा
बबलू उर्फ फिरोज तडवी, शरीफ भिकारी तडवी, तौसीफ शरीफ तडवी, सय्यद फैजान सय्यद, शेख आम शे.रऊफ, तौसीफ मलक, सुबान माना तडवी, रमजान सुबान तडवी, रमजान रसूल तडवी, रहिम सलीम तडवी (सर्व राहणार वाघोदा बुद्रुक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

जळगाव जिल्ह्यातील अवैध सुरू असलेली गोतस्करी कत्तलखाने एक महिन्याच्या आत रोखावी नाही तर मोठ्या प्रमाणात संत मंडळी व हिदुत्ववादी संघटनच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

दरम्यान सावदा पोलिसांन कडून याप्रकरणी पसार झालेल्या वाहन चालकाविरोधात निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !